तब्बल ४ दशके संगीत प्रेमींच्या हृदयावर राज्य करणारे संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आता निधन झाले आहे. त्यांना असलेल्या झोपेच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त समजते.
सोन्याचे मढलेले असायचे बप्पी लहिरी, पहिला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर बप्पी दा यांना आईकडून सोन्याची चेन गिफ्ट मिळाली. यानंतर त्यांची गाणी वारंवार हिट होत राहिली, त्यामुळे त्यांना मिळालेल्या सोन्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजु लागले व यानंतर ते नेहमी दागिने घालून वावरायला लागले.
झोपेच्या आजारामुळे त्यांचे निधन झाल्याचे समजते. संगीतासोबतच सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या छंदाबद्दलही सिनेइंडस्ट्री मध्ये त्यांची बरीच चर्चा व्हायची. त्यांना दागिन्यांची इतकी आवड होती की त्यांच्या पत्नीसह त्यांच्याकडे सुमारे १ कोटी किंमतीचे दागिने आहेत.
त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्येही सोन्याचा उल्लेख केला आहे…अवघ्या काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही त्यांना त्यांच्या दागिन्यांची आठवण येत होती. स्वतःचा एक जुना फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते की, ‘जुने नेहमीच सोने असते.’ त्या जुन्या फोटोतही ते दागिन्यांनी भरलेले दिसत होते.
बप्पी लाहिरी यांनी सोनेरी काड्या असलेला चष्मा आणि गळ्यात सोन्याची चेन घातली आहे. तसेच त्यांच्या हातात सोन्याचे दागिने ही आहेत. ते नेहमी लाखोंचे दागिने घालायचे त्याच्याकडे सध्या किती सोने-चांदी-हिरे आहेत, याची अद्ययावत माहिती अजूनतरी उपलब्ध नाही. याबाबतची माहिती त्यांनी काही वर्षांपूर्वी दिली होती. २०१४ मध्ये ते लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांनी शपथपत्रात सांगितले होते की, त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे किती दागिने आहेत ते.
प्रतिज्ञापत्रानुसार, त्यावेळी त्यांच्याकडे ७५२ ग्रॅम आणि त्यांची पत्नी चित्रांशी यांच्याकडे ९६७ ग्रॅम सोने होते. सध्याच्या किंमतीनुसार त्यांची एकूण किंमत सुमारे ८६ लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे ४.६२ किलो आणि पत्नीकडे ८.९ किलो चांदी होते. नवीनतम किंमतीनुसार त्याची किंमत सुमारे ९ लाख रुपये होत आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीकडे ४ लाखांहून अधिक किमतीचे हिरे देखील आहेत.
अशा प्रकारे मी सोन्याच्या प्रेमात पडलो….
सोन्याच्या दागिन्यांवर असलेल्या प्रेमाचा ते अनेकदा उल्लेख करत असत. इंडियन आयडॉल सीझन १२ मध्ये त्यांनी याबाबतची कथा शेअर केलेली. बप्पी लहिरी यांनी सांगितले होते की, त्यांचा पहिला चित्रपट ‘जख्मी’च्या यशानंतर त्यांच्या आईने त्यांना सोन्याची चेन दिली होती. त्यानंतर त्यांची सर्व गाणी सतत हिट होत गेली.
त्यामुळे बप्पी दा यांनी गोल्डला स्वतःसाठी अत्यंत लकी मानले. एल्विस प्रेस्लीचाही त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला होता. प्रेस्लीला पाहिल्यानंतर त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करावीशी वाटली, असे ते यावेळी म्हणाले होते. म्हणूनच पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या पेहरावात दागिन्यांचा समावेश केला आणि पुढे देखील कायमच ते सोन्याच्या दागिन्यांनी मढलेले असायचे.