आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी सीएसकेचा कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू एमएस धोनी ज्याला आयपीएलचा किंग म्हटले जाते, याने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्यानंतर जडेजाला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने ४ वेळा IPL चे विजेतेपद पटकावले आहे.
आता CSK प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठा खुलासा केला असून, एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही, तर गेल्या वर्षीच याबाबत चर्चा झाली होती. पण हा निर्णय कधी घ्यायचा हे धोनीला माहीत असल्याचंही फ्लेमिंगने सांगितलं.
आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यात केकेआरकडून ६ विकेटने पराभव झाल्यानंतर त्याने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही याबद्दल बोललो आहोत, एमएस धोनी माझ्याशी या विषयी फक्त मागील हंगामात बोलला होता. पण हा निर्णय कोणत्या वेळी घ्यायचा हे त्याच्यावर अवलंबून होते. ४ आयपीएल विजेतेपदे आणि बारा सीजन मध्ये ५ उपविजेतेपद पटकावल्यानंतर, धोनीने शुक्रवारी CSK संघाचे नवे कर्णधारपद सोडले आणि जडेजाला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले.
फ्लेमिंग पुढे म्हणाले की, धोनी गेल्यानंतर जडेजा संघाचा नवा कर्णधार असेल हे आधीच ठरले होते. ही माहिती टीममार्फत श्रीनिवासन यांना देण्यात आली. “आम्ही याचा आदर करतो,” तो म्हणाला. हा बदलाचा काळ आहे. जडेजासोबत आमचा संबंध आहे आणि धोनीही संघात आहे. आमच्याकडे नवा कर्णधार आणि माजी कर्णधाराचा अनुभव आहे. हा बदलाचा काळ आहे, परंतु आपण त्यातून सहज बाहेर पडू शकतो. जडेजा २०१२ पासून CSK संघाचा खेळाडू आहे.
जडेजा आता CSK चा तिसरा कर्णधार बनला आहे. धोनी२००८ पासून या संघाची कमान आपल्या हातात घेत आहे. या संघाचे कर्णधार असलेल्या धोनीने जवळपास २१३ सामन्यांमध्ये संघाला १३० सामन्यांत विजय मिळवून दिला. मात्र, यादरम्यान केवळ ६ सामन्यांसाठी सुरेश रैनाला संघाचे नेतृत्व देण्यात आले. ज्यामध्ये संघाने केवळ २ सामने जिंकले. मात्र आता संघाचा नवा कर्णधार झाल्यानंतर जडेजा संघाला पाचवे विजेतेपद मिळवून देईल, अशी आशा सर्वांना आहे.