महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) आयपीएल २०२२ मध्ये खूप स्फोटक दिसत आहे आणि नेहमीप्रमाणे या हंगामात फिनिशरची भूमिका बजावत आहे. रविवारी दुहेरी हेडरच्या दुसऱ्या सामन्यात सीएसके साठी फलंदाजी करताना एमएस धोनी लहान पण स्फोटक फलंदाजी करताना दिसला, परंतु या सामन्यात धोनीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्याची बॅट चघळताना दिसत आहे. एमएस धोनीने असे का केले, याचा खुलासा टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटू ने केला आहे.
रविवारी IPL २०२२ च्या ५५ व्या सामन्यात धोनीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्या मध्ये एमएस धोनी त्याची बॅट चघळताना दिसत आहे, पण धोनी असे का करतो, याचा खुलासा टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अमित मिश्राने केला आहे. अमित मिश्राने ट्विट केले की, एमएस धोनी आपली बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करतो.
In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022
अमित मिश्रा ने ट्विट करून लिहिले- तुम्ही विचार करत असाल, धोनी अनेकदा त्याची बॅट अशा प्रकारे चघळताना दिसतो. खरंतर तो बॅटमधून त्याची टेप काढण्या साठी असे करतो. त्याला त्याची बॅट स्वच्छ आवडते. धोनीच्या बॅटमधून एकही टेप किंवा धागा निघताना दिसणार नाही.
एमएस धोनी ने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध छोटी पण तुफानी खेळी खेळून पुन्हा एकदा सर्वांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. या सामन्यात धोनी ने ८ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या नंतर नाबाद राहिला होता. एमएस धोनीचा या सामन्यातील स्ट्राईक रेट बघितला तर त्याने २६२.५० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यासोबतच, एमएस धोनी चे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले असून, यासोबतच सीएसके ही विजयाच्या मार्गावर आला आहे.
रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीच्या ८ चेंडूत २१ धावांच्या खेळी मुळे सीएसके ने डीसी समोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यासह धोनी ने कर्णधार म्हणून टी-२० मध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहेत आणि यासह तो ६००० धावा करणारा दुसरा कर्णधार बनला आहे.