काही संघ आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करत आहेत, तर काही साठी हा हंगाम आता पर्यंत निराशा जनक ठरला आहे. आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या वेळी वाईट टप्प्यातून जात आहेत. चेन्नई ने पाच सामन्या पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. मुंबईने अद्याप खातेही उघडलेले नाही. मुंबईने आता पर्यंत पाच सामने गमावले असून गुणतालिकेत संघ शेवटच्या क्रमांकावर आहे. अखेर कोणत्या कारणा मुळे मुंबई सातत्याने सामने हरत आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
१) यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. स्फोटक अष्ट पैलू हार्दिक पांड्या, कुणाल पंड्या आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या हंगामात इतर संघा कडून खेळत आहेत. मुंबई ने या पूर्वी हे खेळाडू सोडले होते आणि इतर संघांनी त्यांना मेगा लिलावात खरेदी केले होते. या तीन खेळाडूंची बदली मुंबईला अद्याप करता आलेली नाही. त्याची उणीव संघाला त्रासदायक ठरत आहे. संघातील अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाज सध्या अपेक्षे प्रमाणे कामगिरी करत नाहीत.
View this post on Instagram
२) मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्माची बॅट या मोसमात आता पर्यंत चाललेली नाही, ज्या मुळे संघाला खूप नुकसान होत आहे. रोहितने या मोसमात ५ सामन्यात केवळ १०८ धावा केल्या आहेत. पुढील सामन्या मध्ये रोहितचा खराब फॉर्म कायम राहिल्यास संघ प्लेऑफ मध्ये पोहोचू शकणार नाही.
३) मुंबईचा संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर अधिक अवलंबून आहे. त्याच्या शिवाय इतर वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहलाही या मोसमात ५ सामन्यात केवळ ४ विकेट घेता आल्या आहेत. अशा स्थितीत संघातील इतर गोलंदाजांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
४) यावेळी मुंबईची फिरकी गोलंदाजीही खूपच कमकुवत दिसत असून राहुल चहरचा अभाव संघाला भासत आहे. संघाकडे एकही वरिष्ठ फिरकी गोलंदाज नाही, त्यामुळे विरोधी संघाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारत आहेत.
५) मुंबई इंडियन्स प्रत्येक सामन्यात त्यांच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये बरेच बदल करत आहे, ज्यामुळे काही खेळाडूंना पुरेशा संधी मिळत नाही. त्यामुळेच संघाला एकजुटीने कामगिरी करता येत नसल्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे.