रागाच्या भरात पंतने का केले या फेमस अभिनेत्याला ब्लॉक! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!!

तुम्हाला माहिती आहेच की, आयपीएलचा ३४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना अतिशय रोमांचक होता. पण या मॅचच्या शेवटी खूप ड्रामाही पाहायला मिळाला. मैदानी पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतने आपल्या खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ऋषभ सोशल मीडियावर सतत चर्चेचा भाग असतो.

राजस्ताजन रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या आजच्या सामन्यात ऋषभ पंतचे हे नाटक पाहिल्यानंतर कळले की तो आयुष्यात कधीही मोठा खेळाडू होणार नाहीअसे म्हणून बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान उर्फ ​​केआरके यानेही ऋषभची खरडपट्टी काढली, त्यामुळे ऋषभने केआरकेला ब्लॉक केले. त्यानंतर केआरकेच्या या ट्विटला लाखो लोकांनी लाईक केले आणि अनेक लोक त्यावर आपल्या प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. नंतर केआरकेने आणखी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की ऋषभ पंतने मला ब्लॉक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)


याअगोदर सुद्धा पंत ने एक अभिनेत्रीला ब्लॉक केले होते . मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतने बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला देखील व्हॉट्सअपवर ब्लॉक केलेहोते ,  झी न्यूजच्या याच बातमीनुसार, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आले. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळू शकले नाही. त्या दिवसांत ऋषभ खूपच खराब फॉर्ममध्ये धावत होता, त्यामुळे तो खूप चिंतेतही होता. पण ताणतणाव आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याने उर्वशी रौतेलाला ब्लॉक केले.

काल रात्री राजस्थान आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली संघाला २२३ धावांची गरज होती. जिथे २० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लार पॉवेलने ओबेड मॅकॉयविरुद्ध षटकार ठोकला. हा चेंडू नो बॉल आहे हे कोणालाच माहीत नव्हते, यावर ऋषभने तिसऱ्या पंचाकडे नो बॉलबाबत तपास करण्याची मागणी केली. पण मैदानी पंचाचा हा निर्णय बदलणे अशक्य होते. तेव्हाच ऋषभ पंतचा राग स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर रागाच्या भरात ऋषभने मैदानात उपस्थित असलेल्या आपल्या दोन्ही फलंदाजांना मैदानाबाहेर बोलावण्याचे संकेत दिले. एवढ्या नाट्यानंतर शेन वॉटसनने ऋषभला समजावलं, तेव्हा ऋषभ शांत झाला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप