पंजाब किंग्ज चा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनने आयपीएल २०२२ च्या ३८ व्या सामन्यात चेन्नई विरुद्ध हंगामातील पहिला सामना खेळला होता. त्याच्या दुसऱ्याच षटकात त्याने शिवम दुबेची विकेट घेत चेन्नई च्या फलंदाजी चे कंबरडे मोडले होते, पण त्याच्या गोलंदाजी पेक्षा ही त्याने सामन्या दरम्यान लावलेल्या चेहऱ्याच्या शील्ड ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण फेस शील्ड घालून गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत, ऋषी धवन या फेस शील्डसह गोलंदाजी का करत आहे हे तुम्हासर्वांना जाणून घ्यायचे असेल, या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला धवनची मागील कहाणी सांगणार आहोत.
View this post on Instagram
ऋषी धवन हा भारतीय देशांतर्गत क्रिकेट मधील एक प्रसिद्ध खेळाडू आहे, तो विजय हजारे ट्रॉफी मध्ये हिमाचल कडून खेळला होता, या खेळाडूने स्वबळावर हिमाचल च्या संघाचे नेतृत्व तामिळनाडू विरुद्धच्या अंतिम सामन्यात केले होते. या टूर्नामेंट मध्ये ऋषीने बॉल आणि बॅटने चांगले योगदान दिले होते, त्यानंतर आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन मध्ये पंजाब किंग्स च्या टीम मध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आता चेन्नई विरुद्ध त्याला या मोसमातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्याने पहिल्या षटकात केवळ ३ धावा दिल्या आणि पुढच्याच षटकात शिवम दुबेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
पण ऋषी धवन च्या गोलंदाजी पेक्षा ही सगळ्यांच्या नजरा या सामन्यात त्याने घातलेल्या फेस शील्ड वर लागल्या होत्या. तर आम्ही तुम्हाला सांगतो की ऋषी धवन आपल्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी ही शील्ड घातली आहे. रणजी ट्रॉफी २०२२ च्या दुसऱ्या सत्रात ऋषी गोलंदाजी करताना फॉलो- थ्रू मध्ये फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या तोंडावर येऊन लागला होता. त्यानंतर त्याला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे तो आता चेन्नई विरुद्ध बचाव म्हणून फेस शिल्ड घालून गोलंदाजी करत होता.
वानखेडे स्टेडियम वर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज ने चेन्नईचा ११ धावांनी पराभव करत चालू मोसमातील चौथा विजय नोंदवला. रणजी ट्रॉफी मध्ये हिमाचल प्रदेश संघाचे कर्णधार असलेला ऋषी धवन ६ वर्षां नंतर आयपीएल मध्ये खेळताना दिसला आहे. याआधी २०१६ मध्ये त्याने शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.