आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.
आयपीएलच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात आणि आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडूही एकाच सामन्यातून करोडोंची कमाई करतात. जर आपण आयपीएलची कमाई कशी होते याबद्दल बोललो, तर आयपीएलची मुख्य कमाई डिजिटल ब्रॉडकास्टिंगसह प्रायोजकत्वातून येते. याशिवाय आयपीएलला तिकीट विकण्यासारख्या अनेक मार्गांनी कमाई होते.
अश्या जगप्रसिद्ध आयपीएल मध्ये अनेक खेळांडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागते असच एक वेगवान गोलंदाज काईल जेमिसन ला मागच्या वर्षी मोठी बोली लागली होती. तो सर्वात ज्यास्त बोली लागणार दुसरा खेळाडू होता, पण या वर्षी त्याने आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना क्वारंटाइन आणि बायो बबलपासून दूर घरी वेळ घालवायचा आहे. गेल्या वर्षी आयपीएलमधला जेमिसन हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
जेमिसन ने मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी अनेक कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे. गेल्या बारा महिन्यांपासून बायो बबल आणि क्वारंटाईनमध्ये बराच वेळ घालवला. पुढील १२ महिन्यांचे वेळापत्रक पाहता आता मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेमिसनने १२ कसोटी, पाच एकदिवसीय आणि आठ टी-२० सामने खेळले आहेत. तो म्हणाला, “दुसरी गोष्ट म्हणजे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगदी नवीन आहे. आता फक्त दोन वर्षे झाली आहेत, त्यामुळे मला माझ्या खेळावर खूप मेहनत करायची आहे.
तो म्हणाला, “मला वाटतं की मी ज्या पातळीवर असायला हवं तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. जर तुम्हाला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या खेळावर मेहनत घ्यावी लागेल. जेमिसन म्हणाला की आयपीएल न खेळण्याचा निर्णय कठीण होता परंतु भविष्यात तो लीगचा भाग असेल अशी आशा आहे. “सुरुवातीला हा खूप कठीण निर्णय होता. मी यावर खूप विचार केला. पण मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि माझ्या खेळावर काम करायचे आहे.