भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताला दुसऱ्या कसोटीआधी मोठा धक्का बसला, जेव्हा विराट कोहली दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
विराट कोहली जखमी झाल्यानंतर लोकेश राहुलकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. भारताचा नवा कर्णधार झालेल्या लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने आपल्या संघात बदल केला, विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे.
कर्णधार झाल्यानंतर लोकेश राहुल म्हणाला की, मी भारतीय संघाचे कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. कसोटी संघाचे नेतृत्व करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मला चांगले कर्णधार बनून भारताला विजय मिळवून द्यायला आवडेल.
विराट कोहली दुसऱ्या कसोटीत न खेळल्याबद्दल लोकेश राहुल म्हणाला की, “विराट कोहलीच्या पाठीत थोडे दुखत आहे, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात येत आहे. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही कारण विराट कोहलीची दुखापत अधिक गंभीर झाल्यास भारताला पुढे जाणे खूप कठीण होईल.
View this post on Instagram
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सेंच्युरियनमध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना सहज जिंकून इतिहास रचला होता. विराट कोहलीच्या कर्णधारपदा मुळे भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये नंबर १ बनला आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.
विराट कोहली पुढील कसोटीसाठी तंदुरुस्त होऊन केपटाऊनमध्ये खेळेल, अशी आशा भारतीय संघाला आहे आणि आपल्याला सुद्धा आहे.
विराट कोहलीच्या न खेळण्यावर बरेच लोक म्हणत होते की त्याला बंगळुरूमध्ये १०० वा कसोटी सामना खेळायचा आहे, त्यामुळे त्याने जोहान्सबर्ग कसोटी खेळण्यास नकार दिला. तसे, ही सर्व अफवा असून पाठ दुखीमुळे विराट कोहली जोहान्सबर्ग कसोटी सामना खेळला नसल्याचे लोकेश राहुलने स्पष्ट केले.