KKR च्या विरुद्ध शतक च्या आधी क्विंटन कॉक पूर्णपणे निराश का होता? स्वत: सांगितले कारण..!

आयपीएल २०२२ चा ६६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम वर खेळवला गेला होता जिथे लखनऊने २ धावांनी सामना जिंकला होता. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने क्विंटन डी कॉकचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत एकही विकेट न गमावता एकूण २१० धावा केल्या आणि कोलकाता समोर विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात रिंकू सिंगच्या दमदार खेळीनंतर कोलकाता संघाला २० षटकांत ८ गडी गमावून २०८ धावाच करता आल्या. संघाचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने लखनौला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यानंतर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

सामनावीर ठरल्या नंतर क्विंटन डी कॉक म्हणाला की, मी काही सामन्यां मध्ये खराब कामगिरी केल्याने मी निराश झालो होतो. यासोबतच त्याने कोलकात्याचे ही कौतुक केले. क्विंटन डी कॉक म्हणाला, गेल्या काही सामन्या मध्ये मी खराब कामगिरी केली होती त्यामुळे मी निराश झालो होतो. आज अशी कामगिरी करून मला आनंद झाला आहे. आम्ही मागील काही सामने ही गमावले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Lucknow Super Giants (@lucknowsupergiants)

कोलकात्याचे कौतुक करताना तो म्हणाला, आजचा सामना इतका जवळ जाईल असे मला वाटले नव्हते. त्यांच्या फलंदाजांनी आज उत्तम फलंदाजी केली. शेवटच्या षटकात आम्ही घाबरलो होतो पण लुईसच्या त्या झेलने सामना आमच्या हातात आला. जसे ते म्हणतात ना चांगले झेल सामने जिंकवतात.

कोलकाता विरुद्ध प्रथम सलामी वीर क्विंटन डी कॉक ने शानदार अर्धशतक झळकावले. केएल राहुल सोबत त्याने ही डावाची सुरुवात संथ केली पण नंतर त्यानेही रंगत आणण्यास सुरुवात केली होती. डी कॉकने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर डी कॉक एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शतकही झळकावले. क्विंटन डी कॉकने ५९ चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्याने ७० चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १४० धावा केल्या होत्या. त्यामुळेच त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप