IPL २०२२ ही चक्क या देशात होणार आहे, कारण आले समोर..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ सीझनचे आयोजन दक्षिण आफ्रिका करू शकते. गुरुवारी एका वृत्तपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की जर भारतातील कोविड-१९ ची तिसरी लाट एप्रिलच्या सुरुवातीला संपली नाही तर श्रीलंकेलाही पर्यायी स्थान म्हणून ठेवले आहे.

२०२१ मध्ये, कोविड-१९ मुळे संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे आढळल्याने भारतातील आयपीएलचा १४ वा हंगाम ४ मे नंतर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर स्पर्धेचा उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवले गेले होते, १५ ऑक्टोबर रोजी दुबई येथे चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामना जिंकला होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आम्ही नेहमीच UAE वर अवलंबून राहू शकत नाही, म्हणून आम्ही अधिक पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे, दक्षिण आफ्रिकेच्या वेळेतील फरक देखील खेळाडूंसाठी चांगला आहे.

लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये जोडल्यामुळे आयपीएलची २०२२ अधिक लांबलचक होणार आहे. असे झाल्यास दक्षिण आफ्रिका दुसऱ्यांदा आयपीएलचे आयोजन करेल. यापूर्वी, भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे २००९ चा हंगाम तिथे घेण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेची निवड करण्यामागचे कारण म्हणजे त्यांनी भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी चांगली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स दिले आहेत ज्यात भारतीय संघ बायो-बबल मध्ये राहत आहे.

भारतीय संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आयरीन कंट्री लॉजमध्ये थांबला होता आणि सध्या केपटाऊनमधील ताज हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे. एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, दुसऱ्या कसोटीसाठी संघ ज्या ठिकाणी थांबला होता ते ठिकाण अनेक एकरांमध्ये पसरले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून तेथे राहणाऱ्या खेळाडूंसाठी गोष्टी सुलभ झाल्या आहेत.

आता या हंगामात १० संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये लखनऊ आणि अहमदाबादची नावेही जोडली गेली आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा समावेश आहे. दोन नवीन संघ आल्यानंतर आता पुढील महिन्यात यासाठी मेगा लिलाव होणार आहे. खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाले तर संघ वाढल्याने ४५ ते ५० नवीन खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. यामध्येही ३० ते ३५ युवा भारतीय खेळाडू असतील.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप