विराट च्या एका सल्ल्याने सिराजने जो रूटला शून्यावर आऊट केले, फॅन्स म्हणाले ”आज कोहलीचा दिवस आहे”

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात काल भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि जो रूटच्या रूपाने इंग्लंड संघाच्या पहिल्या 2 षटकात 2 विकेट पडल्या होत्या.

या दोन्ही फलंदाजांची मोहम्मद सिराजने शिकार केली आणि दोन्ही फलंदाजांना शून्यावर पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. जो रुटच्या विकेटबद्दल एक खास गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्यात त्याआधी काही सवांद झाला आणि कदाचित त्यांनी त्याच वेळी रूट विरुद्ध काही खास संदेश विराट कोहली देताच सिराज ने तो विराट चा शब्द सत्यात उतरवला आणि जो रूट ला आऊट केले.

त्यानंतर जो रुटला मोहम्मद सिराजने धाव घेत रोहित शर्माचा झेल टिपला. कोहली आणि सिराजच्या या शानदार नियोजनाच्या यशानंतर चाहते खूप उत्सुक आहेत आणि या मालिकेतील हा निर्णायक सामना असल्याने चाहत्यांसाठी हा सामना खूपच रोमांचक असणार आहे.

इंग्लंडकडून जोस बटलरने 60 धावा केल्या, त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याची शिकार केली. रवींद्र जडेजाने सुरेख झेल घेत पंड्याला बटलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात मदत केली. यावेळी इंग्लंडच्या संघाला 38 षटकांत 7 विकेट गमावून 201 धावा करता आल्या.

इंग्लंड आज भारतीय संघाला किती धावांचे लक्ष्य देतो हे पाहावे लागेल. दुसरीकडे, विराट कोहलीच्या चाहत्यांना आशा आहे की, आज तो आपल्या बॅटने शतक झळकावू शकेल. या सामन्यानंतर कोहली अनेक मालिकांमधून संघाबाहेर जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्या नंतर भारतीय संघ खूपच खुश दिसून आला हा सिरीज नंतर रोहितशर्म ने नॉन्सटॉप ८ जिंकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर कोरून घेतला आणि इंग्लड मध्ये जाऊन इंग्लड ला हरवणे ते पण एक सिरीज नाही तर तब्बल २सिरीज जिंकून त्याने इतिहास घडवला आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप