ठाण्याचे तगडे नेते एकनाथ शिंदे यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क!! जवळ आहेत हि शस्त्रे..!

शिवसेना पक्षात भूकंप घडवून मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या सत्तेला जोरदार हादरा देणारे नगर विकास मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचालीकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे! याचे सर्वात महत्वपूर्ण कारण म्हणजे देशाचे केंद्रस्थान असलेल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेचे राजकारण पेटलेले दिसत आहे आणि म्हणूनच सगळ्या देशाची नजर आता महाराष्ट्रावर एकवटली आहे! हे सर्व घडत आहे ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे!

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द सर्वांना माहिती आहे. एक रिक्षाचालक ते मंत्रीपद असा त्यांचा प्रवास झालेला आहे. अनेक वर्षांपासून ते मंत्री पदावर कार्यरत देखील आहेत. २०१९ मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल साडेअकरा कोटीची संपत्ती आहे असल्याचे समजते.

राज्याच्या महाविकास आघाडी मध्ये महत्वपूर्ण ठरलेलं नगरविकास खातं हे गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे पाहत आहेत. नगरविकास खातं हे बहुतांशी मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात, उद्धव ठाकरे यांनी हे खात एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. म्हणूनच गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांची मालमत्ता किती पटीने वाढली याचे आकडे अजून तरी समोर आलेले नाहीत. मात्र २०१९ मध्ये त्यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा लेखाजोखा लिहिलेला आहे.

एकनाथ शिंदे यांची एकूण जमीन किती आहे?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने २८ लाख रुपयांची शेतजमीन असल्याचे समजते. या शेत जमिनीचे काढलेले हे मूल्य २०१९ मधील आहे आणि आजच्या काळात त्यात वाढ झाल्याचे शक्य आहे!

नेमक्या कुठे आहे जमिनी?

दरेगाव येथे, तसेच महाबळेश्वर मध्ये ५ हेक्टर म्हणजे जवळपास १२ एकर जमीन आहे. तर चिखलगाव, ठाणे येथे बायकोच्या नावाने १.२६ हेक्टर जमीन असल्याचे समजते.

व्यावसायिक इमारती- वागळे इस्टेट मध्ये बायकोच्या नावाने तीस लाख रुपयांचा दुकानामध्ये गाळा.

रहिवाशी इमारत
१ खोली – धोत्रे चाळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम : क्षेत्रफळ ३६० Sq.Ft

१ फ्लॅट – लँडमार्क को ऑप हौ सोसायटी : क्षेत्रफळ २३७० Sq.Ft

बायकोच्या नावाने असलेलं घर
१ फ्लॅट – शिवशक्ती भवन : क्षेत्रफळ १०९० Sq.Ft

१ फ्लॅट – लँडमार्क को ऑप हौ सोसायटी : २३७० Sq.Ft

घरं, गाळ्यांचा चालू तत्कालीन बाजारभाव : ९ कोटी ४५ लाख

एकूण कर्ज किती?
२०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांनी
आपल्या नावावर ३ कोटी ७४ लाखाचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये TJSB चं २ कोटी ६१ लाखांचं गृहकर्ज आहे. याशिवाय श्रीमान रिअॅल्टीच्या ९८ लाखांच्या कर्जाचाही यात समावेश आहे.

२०१९ मध्ये किती गाड्या होत्या?

स्कार्पिओ- २
बलेरो – १
इनोव्हा – २
अरमाडा -१
टेम्पो -१
एकूण किंमत – ४६ लाख

२०१९ मध्ये एकूण सोनं किती होतं?
सोने : २५ लाख ८७ हजार

रिव्हॉल्वहर- १
पिस्तूल-१

गुंतवणूक
शिवम ट्रान्सपोर्टमध्ये ३ लाख रुपयांची गुंतवणूक
बॉम्बे फूड पॅकर्स : ८ लाख
शिवम एन्टरप्रायजेस ; ११लाख

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप