तुझे मेरी कसम या चित्रपटात काम करण्याच्या निमित्ताने एकत्र आलेली सदाबहार जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख! यांच्या डे टिंग पासून ते लग्नापर्यँतचा प्रवास अतिशय सुंदर ठरलेला.
हल्लीच रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखचा या दोघांचाही एक फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे. आणि यावरुनच सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा जोरात रंगल्या आहेत.
रितेश देशमुख आणि जेनेलिया हे दोघेही त्यांच्या विविध सोशल मीडिया हँडल वरून प्रचंड अॅक्टीव असलेले दिसतात. वेगवेगळे मजेशीर रिल्स बनवून त्यांनी अजूनपर्यंत प्रेक्षकांची फेव्हरेट जोडी म्हणून टिकून राहण्यात यश मिळवले आहे!
तर नुकताच त्यांचा एक फोटो समोर आला आहे. मात्र हा फोटो त्यांच्या फोटोशूट अथवा कसल्या सेलिब्रेशनचा वगैरेचा नसून त्यांच्या आगामी ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) या सिनेमाचा आहे. यावरून अंदाज लावू शकतो की ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे! रितेश आणि जेनेलिया यांचा सिनेमा म्हणजे धमाल आणि मस्ती यात काहीच शंका नाही.
View this post on Instagram
सिनेमाचे पोस्टर पाहून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की, हा सिनेमा पूर्णपणे कॉमेडीने भरलेला असणार आहे. यात दोघेही प्रेक्षकांना खूप हसवताना दिसण्याची चर्चा बॉलिवूड मध्ये रंगली आहे. शाद अली यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या सिनेमाचा फर्स्ट लुक टी-सीरीजने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र हे पोस्टर पाहून चाहत्यांना मात्र आश्चर्याचा जोरदार धक्का बसलेला दिसत आहे.
टी-सीरीजने इन्स्टावर शेअर केलेल्या ‘मिस्टर मम्मी’ च्या पोस्टरमध्ये रितेश देशमुखचा नेहमीप्रमाणे मजेदार लूक सर्वांना पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये चक्क रितेश प्रे ग्नेंट असल्याचे दिसत आहे!! यावरून चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रितेशचा बेबी बंप दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये बेबी बंपमुळे रितेशला पॅन्टचे बटन बंद करता येत नाहीये अशी काहीशी अवस्था झाली आहे अस चित्र दिसतंय. तर एका पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया झोपलेले दिसत आहेत आणि दोघांचेही त्यात बेबी बंप दिसत आहे.
म्हणूनच ‘मिस्टर मम्मी’ या सिनेमाचे पोस्टर पाहून चाहते आश्चर्यचकीत होताना दिसत आहेत!
रितेश देशमुखच्या या आगामी मजेशीर सिनेमाचे पोस्टर पाहून चाहते आश्चर्यचकीत तर झालेच आहेत पण त्या पोस्ट खाली विविध कमेंट देखील करताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, OMG हे काय होणार आहे ? तर दुसऱ्याने म्हटले आहे की, काहीही….तर काही चाहत्यांना या सिनेमाचे पोस्टर फारसे रूचलेले दिसत नाहीये.. तर काहींजण हे सगळं हसण्यावारी घेताना दिसत आहेत.
कॉमेडी फिल्म वाटत असली तरी गंभीर विषय हाताळणार आहे ‘मिस्टर मम्मी’
View this post on Instagram
परंतु असे असले तरी या सिनेमाच्या माध्यामातून दिग्दर्शक गंभीर विषय हाताळत असल्याचे वृत्त समजत आहे. ग र्भवती असताना महिलांना अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचीची पुरूषांना जाणीव व्हावी, हा मुद्दा यातून मांडण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. हसण्यासोबत महिलांच्या या समस्यांची जाणीव त्यांना होणार त्रास या सिनेमातून उलगडणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे!
तब्बल दहा वर्षानंतर एकत्र पाहायला मिळणार या सदाबहार जोडीचा जलवा!! बॉलीवूमधील क्यूट आणि आनंदी कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया तब्बल दहा वर्षानंतर या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या मुळे सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे! २०१२ मध्ये आलेल्या ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या सिनेमात ही जोडी शेवटची एकत्र दिसली होती. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत. दोघांचेही चाहते या जोडीला एकत्र पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत!!