सोनाली कुलकर्णी कायमच सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. आणि नेहमीच तिच्या हटके नी वेगवेगळ्या फोटोशूटनं ती चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. नुकतेच अक्षय्य तृतीयेच्या औचित्याने सोनाली कुलकर्णीनं सिल्क साडीत एक फोटोशूट केलं आहे. आणि याच भन्नाट फोटोशूटमुळे ती सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
सोनाली कुलकर्णीचा सिल्क साडीतील हा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिलात का? PHOTOS पाहून पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडालं! काळ्या रंगाच्या सील्क साडीत सोनालीचं सौदर्य अप्रतिम खुलुन दिसत आहे.
या फोटोशूट मध्ये सोनालीनं सिल्कच्या साडीवर ऑक्सडाईज दागिने घातले असून सोनालीच्या या ग्लॅमरस फोटोशूटवर तिच्या चाहत्यांकडून भरभरून कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. सोनालीनं नुकतच तिच्या सोशल मीडियाच्या इन्स्टा हँडलवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार पाडला आहे. काळी साडी आणि त्यावरती रंगबेरंगी वेगळी फुलांची नक्षी अशी ही सील्क साडी सोनालीवर अतिशय शोभून दिसत आहे.
View this post on Instagram
असे असले तरी सध्या सोनाली एका वेगळ्या कारणामुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत अली आहे. सोनालीच्या लग्नाचा वाढदिवस आता जवळ आला आहे. यानिमित्त ती कुणालसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. याचे कारण म्हणजे सोनालीनं लॉकडाऊनमध्ये अगदी साध्या पद्धतीनं कुणालसोबत लंडनमध्ये लग्नाची गाठ बांधली होती. सोनालीच्या या लग्नाला अगदी घरची मोजकीच मंडळी उपस्थित होती.
गेल्यावर्षी सात मे रोजी सोनालीने कुणालशी लग्न केले. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मुळे ते मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईक यांना कोणालाच बोलवु शकले नव्हते. सोनाली आणि कुणालचे आई वडील हे व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या लग्नाची साक्षीदार झाले होते. मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने 7 मे 2019 रोजी कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्नगाठ बांधली.
View this post on Instagram
पण येत्या 7 मे रोजी लंडनमध्ये सोनाली आणि पुन्हा पुन्हा एकदा विवाहबद्ध होतील!: महाराष्ट्रीय विवाह पद्धती नुसार हा लग्न सोहळा पार पडणार आहे. सोनाली सध्या मुंबईतच असून लंडन साठी ती लवकरच रवाना होणार आहे. तर सोनालीचा पती कुणाल लंडनचाच असून तो कामानिमित्त दुबईला राहतो. कुणालचे कुटुंबीय लंडनला वास्तव्य असून त्याचे शिक्षण सुद्धा लंडनमध्येच पूर्ण झाले आहे.