तुझी माझी रेशीमगाठ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना चा पती अभिनय न करता साऊथ इंडस्ट्री मध्ये करतो हे काम..!

साऊथ इंडस्ट्री प्रमाणे मराठी हिरो आणि हिरोईन देखील लोकप्रियतेच्या बाबतीत कमी नाहीत बरं का! त्यांचे चाहते आणि रसिक प्रेक्षक यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नवनवीन गोष्टी माहिती करून घेण्यात देखील खूप इंटरेस्ट असतो. जसं या सिनेस्टार्सच्या ऑन स्क्रीन लूक आणि भूमिकेबद्दल वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा होत असते, तसं त्यांच्या ऑफ स्क्रीन लाइफ बद्दल देखील लोक ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून बोलत असतात.

जिच्या निरागस सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयामुळे तमाम तरुण वर्गाच्या हृदयावर राज्य करणारी एक मराठी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे! हिंदी मधील झी टीव्ही वरील प्रचंड गाजलेल्या ‘पवित्र रिश्ता’ (२००९) या मालिकेत आपण सर्वप्रथम प्रार्थनाला पाहिले. तेव्हाच तिने तिच्या निरागस भूमिकेमुळे प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले होते. यासोबतच ती ‘९x झकास हिरॉईन हंट’ च्या पहिल्या सीजन ची ती विनर देखील राहिली आहे.

प्रार्थना मराठी सोबतच हिंदी मालिका आणि अनेक चित्रपटांतून देखील अभिनय करत झळकली आहे. ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’
(२०१३), ‘मितवा’ (२०१५), ‘कॉफी आणि बरंच काही’ (२०१५), ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ (२०१६), ‘व्हॉट्सअप लग्न’ (२०१८) ही तिच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत. ‘लव्ह यू मि. कलाकार’ (२०११) आणि ‘वजह तुम हो’ (२०१६) यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही प्रार्थनाने महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. तर अशी ही लोकप्रिय अभिनेत्री २०१७ मध्ये लग्न बंधनात अडकली आणि सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला!

View this post on Instagram

A post shared by Abhishek Jawkar (@abhishekjawkar)

आपल्या या गोड अभिनेत्रीने दिग्दर्शक व लेखक असलेल्या अभिषेक जावडेकर याच्याशी नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले. आतापर्यंत अभिषेकने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या डिस्ट्रिब्युशनचे काम पाहिले आहे. अभिषेकचा ‘डब्बा ऐसपैस’ (२०१५), ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ (२०१५) या मराठी चित्रपटांच्या सहनिर्मितीमध्ये देखील सहभाग आहे.

प्रार्थना आणि अभिषेकची जोडी खरंतर मराठी सिनेइंडस्ट्री मध्ये क्यूट कपल म्हणून प्रसिद्ध आहे. लग्नाआधी हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते, तेव्हा पासूनच ते एकमेकांना छान ओळखु लागले, हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या विवास सोहळ्याला अनेक मान्यवर कलाकारांनी हजेरी लावली होती.

प्रार्थना नेहमी तिच्या सोशल मीडिया हँडल वरून तिचे आणि अभिषेकचे सुंदर फोटो शेअर करत राहते. सध्या ती तुझी माझी रेशीमगाठ या मराठी मालिकेतून झळकत आहे!यातल्या प्रार्थनाच्या अभिनयावर सगळेच फिदा झाले आहेत. तिची हसण्याची वेगळीच स्टाइल देखील प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. लवकरच ती आपल्याला आगामी ‘छूमंतर’ नावाच्या या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

प्रार्थनाला तिच्या सिनेकारकिर्दीत असेच अजून चित्रपट मिळत राहतील आणि ती अशीच आपल्या चाहत्यांना आपल्या लाघवी अभिनयाने खूष करत राहील यात दुमत नाही. तिच्या या सुंदर प्रवासात तिला तिच्या चाहत्यांबरोबरच तिच्या पतीचीही मोलाची साथ मिळत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप