IPL 2024 : धोनीच्या चालाकी पुढे शुभमन गिलच्या बत्त्या गुल, CSK ने आपल्याच इलाक्यात गुजरात चे केले वस्त्रहरण..!

IPL 2024  मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीचा सामना खेळला गेला. सीएसकेने हा सामना 63 धावांनी जिंकला. त्याचा हा दुसरा विजय आहे. सामन्या दरम्यान फलंदाजांनी आधी तांबडतोड ब्याटिंग केली. शिवम दुबेने तुफानी फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघात अराजकता निर्माण केली. जेव्हा गोलंदाजांचा विचार केला, तेव्हा त्यांनी तगडी गोलंदाजी करत गुजरातला बॅकफूटवर आणले. यासह CSK ने IPL 2024 मध्ये गुजरात ला लोळवत आणखी दोन गुण मिळवले.

View this post on Instagram

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

CSK च्या फलंदाजीची अवस्था : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स 26 मार्च रोजी चेन्नईतील एम चिदंबरम म्हणजेच चेपॉकच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळले. नाणे फेकले आणि गुजरातच्या बाजूने पडले. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात अतिशय स्फोटक झाली. रचिन रवींद्र (46) आणि रुतुराज गायकवाड (46) यांनी पहिल्या विकेटसाठी 5.2 षटकांत 62 धावा जोडल्या. यानंतर शिवम दुबेने 23 चेंडूत 52 आणि समीर रिझवीने 6 चेंडूत 14 धावा केल्या. सीएसकेने गुजरातसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

View this post on Instagram

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

गुजरात टायटन्सला स्पर्धेतील पहिला पराभव झाला: चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सची फलंदाजी अतिशय लाजिरवाणी होती. अवघ्या 114 धावांवर त्यांनी 5 विकेट गमावल्या. मधल्या फळीत साई सुदर्शनने 31 चेंडूत 37 धावा, डेव्हिड मिलरने 16 चेंडूत 21 धावा केल्या. मात्र, या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. शुभमनला केवळ 8 धावा करता आल्या. अखेरीस संपूर्ण संघ केवळ 143 धावा करण्यात यशस्वी ठरला. चेन्नई संघाने हा सामना 63 धावांनी जिंकला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top