26 शतके झळकावणारा झंझावाती फलंदाज पंजाब किंग्जमध्ये परतला, आता संघाचा प्लेऑफ खेळण्याचा निर्णय पक्का झाला…!

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या मोसमात पंजाब किंग्ज संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. यामुळे संघ सध्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. आतापर्यंत संघाला 8 सामन्यात केवळ 2 विजय मिळवता आले आहेत. तर संघाला आता शुक्रवारी ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 9वा सामना खेळायचा आहे. पंजाब किंग्जला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. तर 1 मे रोजी पंजाब किंग्जला चेन्नई सुपर किंग्ज सोबत सामना खेळायचा आहे आणि या सामन्यात पंजाब किंग्जचा एक अनुभवी खेळाडू सीएसकेविरुद्ध पुनरागमन करू शकतो.

1 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन या सामन्यात पुनरागमन करू शकतो. कारण, धवनच्या दुखापती आणि पुनरागमनाबद्दल बोलताना पंजाब किंग्जचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी म्हणाले की, “तो फॉर्मात होता आणि आम्ही त्याची फलंदाजी चुकवली. आम्ही काल त्याला फलंदाजी करताना, नेटमधून जाताना आणि सर्वकाही पाहिले. तो पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहे. आशा आहे की तो CSK विरुद्धच्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल.” धवनच्या पुनरागमनामुळे पंजाब किंग्जची फलंदाजी मजबूत होऊ शकते.

धवन संघाला प्ले ऑफमध्ये नेऊ शकतो:

  1. पंजाब किंग्ज सध्या 8 सामन्यांतून 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. मात्र कर्णधार शिखर धवनच्या पुनरागमनामुळे संघाला वेगळी आशा मिळू शकते आणि संघ विजयी ट्रॅकवर परत येऊ शकतो. कारण, धवन संघात असेपर्यंत वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती.
  2. तर पंजाब किंग्जने आतापर्यंत जिंकलेले 2 सामने देखील धवनच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. त्यामुळे धवनच्या पुनरागमनानंतर संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पॉइंट टेबलवर लढताना दिसू शकतो. पंजाब किंग्जने आपले उर्वरित 6 सामने जिंकल्यास संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.

धवनच्या नावावर एकूण 26 शतके आहेत: शिखर धवन सध्या दिग्गज खेळाडू आहे. मात्र, सध्या धवन टीम इंडियातून बाहेर आहे. पण टीम इंडियाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 24 शतके आहेत. ज्यामध्ये वनडेमध्ये 17 शतके आणि कसोटी क्रिकेटमध्ये 7 शतके झळकावली. त्याचबरोबर शिखर धवनच्या नावावर आयपीएलमध्ये 2 शतके आहेत. यामुळे त्याच्या कारकिर्दीत एकूण 26 शतके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *